परभणी, दि.4 (जिमाका) :- एनएसीसीओकडे नोंदणीकृत असलेल्या देह विक्री करणाऱ्या एकुण 45 महिलांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या व 40 महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ दि.3 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी सदरील महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबीर राबविली जातील व मुलांना शिक्षणासाठी शासकीय बालगृह, वसतिगृहामध्ये मोफत व्यवस्था केली जाईल असे सांगितले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव फैजुदीन शेख यांनी महिलांना योग्य ती कायदेशिर मदत दिली जाईल असे सांगितले. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार कैलास वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेतू सेवा प्राधिकरणाचे शेख रफिक उररहेमान यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. -*-*-*-*-