परभणी, दि.12 (जिमाका) : येथील जिल्हा परिषद समोर पाकीजा मोहल्ला मोंढा परिसर येथील एम.के.वर्कशॉप या आस्थापनेत निरीक्षण केले असता येथे 2 बालकामगार आढळुन आले. यावेळी येथील दुकान मालकाने अल्पवयीन मुले कामाला ठेवल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व या दोन बालकांना बालकल्याण समिती समोर उपस्थित करुण त्यांच्या आई – वडिलांना सुपुर्द करण्यात आले. यावेळी आई वडिलांकडुन मुलाला परत कामावर पाठवणार नाही असे लेखी लिहुन घेण्यात आले. हे धाडसत्र कामगार उपआयुक्त चंद्रकांत अ.राऊत यांच्या आदेशान्वये व सरकारी कामगार अधिकारी व्ही.एन.मांणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुकाने निरीक्षक ए.एम.शेख व रफीक पठाण प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती, कार्यक्रम व्यवस्थापक जयश्री पत्रे, अफसर पठाण व पोलीस विभागाचे कर्मचारी -अधिकारी व कृती दलाचे सर्व सदस्य यांनी यशस्वी रीत्या धाडसत्र घेतले. तरी बालकामगार कामावर ठेवू नये असे आवाहन सर्व दुकाने व आस्थापना मालकांना सरकारी कामगार अधिकारी व्ही.एन.माणगावकर यांनी केले आहे. बालकामगार ज्या आस्थापनेवर काम करतांना आढळुन आल्यास योग्य कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल अशा स्पष्ट सुचना दिलेल्या आहेत. असे सरकारी कामगार अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-