परभणी, दि. 14 (जिमाका) :- जिल्ह्यातील पालम नगरपंचायत हद्दीतील व ग्रामपंचायत पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील नगरपंचायत व ग्रामपंचायत पोटनिवडणूक खुल्या, मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत. मतदान व मतमोजणीच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून अनुचित प्रकार घडू नये याकरीता मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील ज्या क्षेत्रात मतदान व मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2 सीएल,एफएल,टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री करण्यास बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दि.16 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपासून व दि.17 जानेवारी व दि.18 जानेवारी संपुर्ण दिवसभर तर मतमोजणीच्या दिवशी दि.19 जानेवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत मद्य विक्रीसाठी बंद ठेवाव्यात असे आदेशात नमुद केले आहे. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे. असेही आदेशात नमुद केले आहे. -*-*-*-*-