परभणी, दि.12 (जिमाका) : कामगार विभागातील वरीष्ठ कार्यालयाकडुन दिनांक 08/12/2021 च्या प्राप्त पत्रान्वये औद्योगिक संबंध संहिता 2020 अंतर्गत शासनाने महाराष्ट्र औद्यागिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा महाराष्ट्र राजपत्रामध्ये दिनांक 03/12/2021 रोजीच्या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द केला आहे. सदर अधिसुचनेव्दारे केलेल्या मसुद्यांबाबत 45 दिवसांचे आत हरकती / सुचना मागविण्यात आलेल्या आहेत. याबाबत परभणी जिल्ह्यातील सर्व संबंधित घटक कामगार, मालक व त्यांच्या सर्व संघटनांनी दि. 3 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या औद्योगिक संबंध संहिता 2020 . अंतर्गत शासनाने महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुद्याचे अवलोकन करुन 45 दिवसाचे आत हरकती / सुचना देण्यात याव्यात. कोणतेही आक्षेप किंवा सूचना , कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी 20, इ ब्लॉक , बांद्रा – कुर्ला संकुल, वांद्रे ( पूर्व ), मुंबई 800 051 यांच्याकडून किंवा mahalabourcommr@gmail.com या ई – मेलवर स्विकारण्यात येतील. असे सरकारी कामगार अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळिविले आहे. -*-*-*-*-