परभणी, दि.12 (जिमाका) : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार शासन निर्णयान्वये विरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक,समाज संघटात्मक ,आधात्मिक, प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात दहा वर्ष काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थाच्या कामाची दाद /दखल घ्यावी. तसेच इतरांना त्यापासुन प्रेरणा मिळावी ,जेणेकरुन या समाजातील समाजसेवक,कलावंत ,संघटनात्मक ,कार्यकर्ते,अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत या करिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थासाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्कारासाठी पुरुषाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त व महिलांचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असावे. सदर पुरस्कारासाठी पत्राबाबतची नियमावली दि.8 मार्च 2019 रोजी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संबंधित असुन त्यांचा संकेतांक क्र.201903082039003522 असा आहे. तरी इच्छूक व्यक्ती व संस्था यांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण,कार्यालय परभणी यांच्याकडे विहित नमुन्यात चार प्रतीत अर्ज करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण,कार्यालय परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-