परभणी, दि.12 (जिमाका) : जिल्ह्यातील शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या /शासकीय वस्तीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास ,भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवु शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील इयत्ता बारावी, बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात /शिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामध्ये मुला-मुलींप्रमाणे निवास ,भोजन,शैक्षणिक साहित्य ,निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत:उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली असुन सदर योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी यापूर्वी दि.31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार स्वाधार योजनेअंतर्गत सन 2020-21 व 2021-22 करिता नविन अर्ज करण्यासाठी दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी सदर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण ,परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-