परभणी, दि.12 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड-19 च्या कामकाजाची सर्व प्रकारची माहिती जनतेला मिळण्यासाठी व त्याअनुषंगाने प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24×7 कोव्हीड वॉर रुम स्थापन करण्यात आली आहे. वॉररुमच्या संनियंत्रण अधिकारीपदी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष आंचल गोयल यांनी जारी केले आहेत. कोव्हीड वॉररुमच्या कामी परभणी क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.संजय हंरबडे, तहसिलदार छाया पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी सहायक कर्मचारी, वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी यांनी वॉररुमध्ये कोरोना विषाणू संसर्गाबाबत प्राप्त झालेले अतिमहत्वाचे संदेश, माहिती किंवा तक्रारींची नोंद घेवून वॉररुममध्ये नेमणूक करण्यात आलेले सहायक कर्मचारी, वैद्यकिय अधिकारी यांच्या मदतीने एफएक्यू मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनूसार प्राप्त तक्रारी, माहिती निकाली काढावी. याकरीता नागरिकांनी दुरध्वनी 02452-226400 व टोल फ्री क्र.1077 यावर संपर्क साधावा. वॉररुम संदर्भात नोडल अधिकारी, सहाय्क कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांनी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाची यादी जिल्हा रुग्णालय, महापालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध करुन देणे. एफएक्यू मधील मार्गदर्शक सुचना गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित रुग्णांना देणे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या समस्यांचे निराकरणे वैद्यकिय अधिकाऱ्यामार्फत करणे. होम आयसोलेशन कालावधीमध्ये रुग्णांनी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणेबाबत रुग्णास सुचना देणे. त्याचप्रमाणे गृह विलगीकरणातील रुग्णांची काळजी घेणाऱ्या काळजीवाहू नातेवाईकास एफएक्यू प्रमाणे काळजी घेणेबाबत सुचना देणे. आदीबाबत माहिती व सुविधा सदर वॉररुमद्वारे उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-