परभणी, दि.27 (जिमाका) :- राज्य सेवा पुर्व परिक्षा 2021 रविवार दि.2 जानेवारी 2022 रोजी पेपर क्रमांक-1 सकाळी 10 ते दुपारी 12 आणि पेपर क्रमांक -2 दुपारी 3 ते सायंकाळी 5 या दोन सत्रात परभणी जिल्हा मुख्यालयातील 11 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परिक्षेला परभणी जिल्हा केंद्रावर एकुण 3 हजार 436 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांची नियुक्ती करण्यात आली असून याबरोबरच 3 समन्वय अधिकारी, 11 उपकेद्रप्रमुख, 51 पर्यवेक्षक, 158 समवेक्षक, 15 सहायक कर्मचारी, 22 शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत.प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच एक भरारी पथक व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विशेष निरीक्षक यांची परिक्षेच्या कामाकरीता नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही परिक्षा दोन सत्रात असून उमेदवारांनी परिक्षा सुरु होण्याच्या किमान दिड तास म्हणजेचे सकाळी 8.30 वाजता उपस्थित राहण्याबाबत प्रवेशपत्रावर सुचना आहेत. उमेदवारांकडून विविध मार्गाने करण्यात येणारे गैरप्रकारचे प्रयत्न लक्षात घेता परभणीतील सर्वच उपकेंद्रावर प्रथमच बायोमेट्रीक उपस्थिती तसेच खोलीनिहाय सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा वापर करयात येणार आहे. यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. असे जिल्हा केंद्रप्रमुख तथा उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांनी कळविले आहे. -*-*-*-*-