अपक्ष उमेदवार शेख रईस जानी यांचा एमआयएमच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा
नांदेड ( तालुका प्रतिनिधी )
अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१.वार्ड क्र. ११ व १३ चे अपक्ष उमेदवार शेख रईस जानी यांचा एम आय एम पक्षाचे वार्ड क्र.११ व १३ चे उमेदवार यांना जाहीर पाठींबा शेख रईस जानी हे अर्धापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत.अर्धापूर नगरपंचायतला गेल्या १० वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असून सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी व नगरसेवक यांनी तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार केला.असून विकासाच्या नावाने आलेल्या निधीचा अपहार करुन स्वताचे खिशे भरण्याचा काम करण्यात आलेला आहे. व जनतेचे कोणतेही काम केले नाही. या सर्व गोष्टींना कंटाळुन अर्धापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख रईस जानी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले होते. व त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतू जनतेसमोर एम.आय.एम.पक्ष सत्ताधारी समोर चांगला विकल्प असल्यामुळे मत विभाजनी होऊन सत्ताधारी पक्षातील वार्ड क्र.११ व १३ च्या उमेदवारांना फायदा होउ नये म्हणून वार्ड क्र.११ व १३ चे अपक्ष उमेदवार शेख रईस जानी यांनी एमआयएम पक्षाचे वार्ड क्र.११ व १३ च्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असुन त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला नाही. व वार्ड क्र.११ व १३ च्या मतदारांना असे आवाहन केले की त्यांनी वार्ड क्र.११ व १३ च्या एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करावे.