सशस्त्र सेनाध्वजदिन निधी संकलन शुभारंभ
1 कोटीपर्यंत निधी संकलन करण्याचा निर्धार
दिनांक (जिमाका) दि. 7 :- जिल्हाधिकारी कार्यालयातनुकताच सशस्त्रसेना ध्वजदिन निधी 2021-22 च्या संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षी जिल्हयाला निधी संकलनाचे 45 लाख 30 हजार एवढे उद्दिष्ट असुन हे उद्दिष्ट 1 कोटीपर्यंत करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हयातील वीरनारी,वीरपिता यांचा सत्कार तसेच विशेष गौरव पुरस्कारांच्या 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
माजी सैनिक व त्यांच्या महिला बचतगटास सर्वोतोपरी मदत करण्यात येइल. ध्वजनिधी जमा करण्यासाठी “हाच संकल्प हिच सिद्वी” उपक्रम राबविताना प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व नागरीकांना आवाहन करुन निधी जमा करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे यांनी सांगितले.
सशस्त्र सेनाध्वजदिन निधी 2021-22 च्या संकलनाचाशुभारंभ अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त सुनिलकुमार लहाने यांच्या उपस्थितीत निधी संकलनाची सुरुवात झाली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे व प्रमुख पाहुणे यांना ध्वज लावून केली.
वर्ष 2020-21 साठीशासनाने जिल्हयाला 35 लाख 50 हजार एवढे उद्दिष्टदिले होते. जिल्हयाने 85 लाख 27 हजार 971 निधी जमा करुन 241 टक्के उद्दिष्ट पुर्ण केलेआहे. तसेच वर्ष 2021-22 साठी शासनाकडुन 45 लाख 30 हजार एवढे उद्दिष्ट मिळालेले असुन ते जिल्ह्याने 1 कोटीपर्यंत निधी जमा करुन पुर्ण करण्याचे निर्धारीत करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांनी नमुद केले. जिल्हयाला दिलेले उद्दिष्ट वेळेच्या आत पुर्ण करुन निधी शासनास जमा केल्याबद्वल शासनाने जिल्हयाचा गौरव प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला आहे.
संकलनात ज्या शासकीय कार्यालयाने, शाळातथा महाविदयालांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचा सत्कार अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तु देवून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजलीवाहून करण्यात आली.सैनिक कल्याणअधिकारी महेश वडदकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ध्वजदिन निधीचे महत्वसांगून संकलीत झालेल्या निधीचाविनियोग व माजीसैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनाकशा राबविण्यात येतात याचीमाहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी माजी सैनिकांसाठी सी एस डी कॅण्टीन, महिलांसाठी बचतगट व पुर्व प्रशिक्षण केन्द्र नांदेड येथे सुरु करण्याबाबतची विनंती जिल्हाधिकारी यांना केली.
या कार्यक्रमाचेसुत्रसंचालन त्रयंबक मगरे यांनी केले. तर कल्याण संघटक अर्जुन जाधव यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमास जिल्हयातील जवळपास 200 माजी सैनिक/विधवा/अवलंबित उपस्थितहोते. माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, बालाजी चुगुलवार व प्रकाश कस्तुरे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यालयाचे बुधसिंग शिसोदे, बालाजी भेारगे,सुर्यकांत कदम व गंगाधर हटकर यांनी विशेष प्रयत्न केले.
0000