Maharshtra News Nanded News

भोजन पुरवठा…

भोजन पुरवठा व स्टेशनरी व इतर साहित्य

पुरवठासाठी मागविण्यात आलेले दरपत्रक रद्द

 

नांदेड (जिमाका) दि.7 :- मागासवर्गीय मुलांमुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी व मुलांमुलींच्या शासकीय निवासी शाळेसाठी आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रके (बंदपाकीट ) मध्ये 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करणे बाबत कळविण्यात आले होते. परंतु शासन निर्णय क्रमांकबीसीएच२०२०/प्र.क्र.25-/शिक्षण२, 29 नोव्हेंबर2021 अन्वये राज्यात सर्व ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या ईनिवीदा राबविणेबाबत समिती गठीत केलेली आहे. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांचे पत्र क.4455 दि. 4 डिसेंबर 2021 अन्वये भोजन पुरवठा व स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठासाठी मागविण्यात आलेले दरपत्रक रद्द करण्यात येत आहेत. याची पुरवठाधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

0000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%