परभणी, दि. 7 (जिमाका) :- जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नियमित नियतना व्यतिरिक्त प्रतीव्यक्ती 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ मोफत असलेल्या धान्याचा लाभ देण्यात येत आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या तालुक्याच्या संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क साधून शासन नियमानूसार देय धान्य हस्तगत करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यात अंत्योदय योजना 43 हजार 695 व प्राधान्य कुटुंब योजना 2 लाख 12 हजार 58 असे एकुण 2 लाख 55 हजार 753 इतके शिधापत्रिकाधारक आहेत. तर अंत्योदय योजनेचे 1 लाख 99 हजार 539 आणि प्राधान्य कुटुंब योजनेचे 10 लाख 7 हजार 641 असे एकुण 12 लाख 7 हजार 180 इतकी संख्या आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरिबांना सामोरे जावे लागत असलेल्या कठीण प्रसांगाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण- v अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे डिसेंबर 2021 ते मार्च 2022 करीता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्य व्यतिरिक्त प्रती सदस्य प्रती महा 5 किलो या परिमाणात मोफत धान्य वितरीत करण्यासाठी शासनाने वितरीत करण्यासाठी शासनाच्या दि.26 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहे डिसेंबर 2021 व माहे जानेवारी 2022 चे तालुकानिहाय लाभार्थी संख्येनूसार संबंधित तहसिलदारांना धान्य वाटपाकरीता योजनानिहाय गहु व तांदुळाचे नियतन पाठविण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-