परभणी, दि.03 (जिमाका) :- नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट़ी किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज शनिवार दि.18 डिसेंबर 2021 पर्यंत करावेत. असे आवाहन परभणी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच AH-MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ असून अर्जातील मा हिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे. पशुपालक स्वत:च्या मोबाईलद्वारे अर्ज भरु शकतील. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-