परभणी, दि.03 (जिमाका) :-जिल्ह्यातील अर्जदारांच्या शिकाऊ अनुज्ञप्तीस सहा महिने पुर्ण होवून अपॉईंटमेंट मिळत नाही, अशा अर्जदारांच्या अडचणींचा विचार करता कार्यालयातील अनुज्ञप्तीाची प्रलंबितता दुर करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवार दि.4 डिसेंबर 2021 रोजी पक्की अनुज्ञप्ती कॅम्पचे आयोजन प्रशासकीय इमारतीत करण्यात आले आहे. तरी कॅम्पच्या एक दिवसपुर्वी अपॉईंटमेंट जारी करण्यात येईल. तरी सर्व अर्जदारांनी आपापल्या अपॉईंटमेंट घेवून सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत हजर राहावे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे. -*-*-*-*-