Maharshtra News Parbhani News

शासकीय व खाजगी परिवहन सेवा, पुरवठादार रेल्‍वे प्रशासन आणि तत्सम सर्व प्रकारच्या आस्‍थापनांसाठी लसीकरण मोहीम

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर :जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे आदेश जारी परभणी, दि.29 (जिमाका) :- परभणी जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून, राज्यामध्ये लसीकरणामध्ये परभणी मागे पडला आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केलेले असून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन Covid-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालता येईल. सूचनेनुसार सर्व सार्वजनिक,शासकीय, खाजगी परिवहन सेवांमध्‍ये, संपुर्ण लसीकरण झालेल्या व्‍यक्‍तींना परवानगी असेल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत. लसीकरण बाबत खालीलप्रमाणे आदेश लागू केले असून या आदेशाची अंमलबजावणी दि. 30नोव्हेंबर 2021 रोजी पासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. 1. सर्व शासकीय / खाजगी परिवहन सेवा पुरवठादार, (अॅटोचालक ट्रॉक्‍टर चालक, मिनी बससह समावेश असेल). यांना स्‍वतःच्‍या कोविड-19 प्रतिबंधात्‍मक लसीकरण दोन मात्र पुर्ण झाल्याची खातरजमा आस्‍थापनेचे मालक/ प्रमुख यांनी करावी. अशाप्रकारचे स्‍वयं घोषणापत्र तसेच लसीकरणी प्रमाणपत्र आपले वापरात असलेल्या वाहनाच्‍या समोरील दर्शनी भागावर लावण्‍यात यावेत. त्‍याशिवाय चालणा-या कोणत्‍याही वाहनावर कोविड अनुरुप वर्तनात कसुर केल्यास रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल. 2. सर्व वाहतूक सेवा देणारे नागरिकांनी कमीत कमी कोविड लसीकरणाचा एक डोस घेतल्याशिवाय परवानगी नाही यासंदर्भात संबंधित आस्‍थापनेचे मालक यांनी खात्री करावी. सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनिस किंवा वाहक यांना देखील रु. 500/- इतका दंड आकारण्‍यात येईल. मालक परिवहन एजन्‍सीज कसुरीच्‍या प्रत्‍येक प्रसंगी रु. 10,000/- इतका दंड आकारण्‍यात येईल. वारंवार कसुर केल्‍यास, मालक, एजेन्‍सीचा परवाना रद्द करण्‍यात येईल. उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे. 1) मास्क वापरणे 2) 2 गज दूरी (6 फुट अंतर) 3) सॅनीटायझरचा वापर 4) आवश्यकते नुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य विशेष सूचना 1. लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात यावा. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे, 100% लसीकरण (प्रथम मात्रा First Dose) झाले पाहिजे. लसीकरणाचा दुसरा डोस Covishield 84 दिवस व Covaxin-28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रथम मात्रा विहित कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांकडे “हर घर दस्तक व माझा वार्ड शतप्रतीशत लसीकरण वार्ड” या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या डोससाठी पाठपुरावा करावा. 2. 100% लसीकरण या कार्यक्रमातंर्गत पाठपुरावा करावा व ठोस जनप्रबोधन करुन लसीकरण मात्रा वाढवावी. 3. Covid Appropriate Behavior (CAB) उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, अ) निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करु शकतील. ब) सदर आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील. सदरील आदेश दिनांक.28 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित करण्यात येत आहेत.

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%