शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 16 :– महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)परीक्षा-2021 परीक्षा रविवार  21 नोव्हेंबर 2021 रोजी ही दोन सत्रात जिल्ह्यात 57 परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 4.30  या वेळेत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.  

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वणी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000