Maharshtra News Nanded News

येसगी येथील नवीन पुलावरील वाहतूक बंद जुन्या पुलावरुन 20 टन पेक्षा कमी क्षमतेच्या वाहतुकीस मुभा

 

येसगी येथील नवीन पुलावरील वाहतूक बंद

जुन्या पुलावरुन 20 टन पेक्षा कमी क्षमतेच्या वाहतुकीस मुभा

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, दि. (जिमाका) 16 :- येसगी येथील जुन्या पुलाची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात आली असून  20 टन वाहन भार क्षमतेपेक्षा कमी भार असलेल्या वाहतुकीस मुभा दिली आहे. याचबरोबर नवीन पुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केली आहे.

ही अधिसूचना 17 नोव्हेंबर 2021 च्या सकाळी 6 वाजेपासून पुढील आदेशापर्यत कायम राहील. रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केल्या जात आहे. 

0000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%