Maharshtra News Parbhani News

लोकहिताची कामे गुणवत्तापुर्ण व वेळेत पुर्ण व्हावी – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

परभणी, दि. 15 (जिमाका) :- नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहराचा आलेख दरवर्षी उंचावत असून जनतेच्या दृष्टीकोनातून पाहताना पुर्णा शहरात लोकहिताची कामे होत असतांना कामे गुणवत्तापुर्ण व वेळेत पुर्ण व्हावी, अशी अपेक्षाही राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पुर्णा शहरात नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकापर्ण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, डॉ. रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, विपलव बाजोरीया, नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे, उपाध्यक्ष विशाल कदम, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पुर्णा नगरपरिषदेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना, उद्यान, रस्ते आदी कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याने नगर परिषदेने तातडीने प्रस्ताव पाठवावेत त्याला मंजूरी देण्यात येईल. नुतन इमारतीतील वाचनालयासाठी लाखों रुपयांचा निधी दिला जाईल तसेच उर्वरित कामांच्या निधीला मंजूरी देण्यात येईल. यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या नुतन इमारतीची पाहणी करुन झालेले काम दर्जेदार असल्याबाबत कौतूकही त्यांनी केले. या कार्यक्रमास नगरसेवकांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. -*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: