परभणी, दि.12 (जिमाका):- जिल्हा प्रशासन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्ताने ” आझादी का अमृत महोत्सव ” या उपक्रमानिमित्त शनिवार दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता श्री. शिवाजी महाविद्यालय परभणी येथे विविध शासकीय योजनांच्या माहितीसंबंधी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, परभणी शहर महानगर पालिका , जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी , कृषी विभाग जि . प . परभणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी , जिल्हा पोस्ट ऑफिस परभणी, जिल्हा अग्रणी बँक परभणी , उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी , सहायक आयुक्त समाजकल्याण परभणी व इतर विभागातील योजना संबंधीचे माहितीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. स्टॉलव्दारे विविध विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ या विषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे . तरी परभणी जिल्हयातील सर्व लाभार्थी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे जिल्हा प्रशासन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. असे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-