परभणी, दि. 11 (जिमाका) :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना तसेच स्थलांतरीत म्हणजेचे परराज्यातुन, जिल्ह्यातून परत आलेल्या मजूर, कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता परभणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून दोन दिवसीय दि.25 व 26 नोव्हेंबर 2021 रोजी ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाकडून करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात सहभागासाठी उमेदवार आयटीआय, दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या मेळाव्यात डिप्लोमा अप्रेंटीस, आयटीआय वेल्डर, फिटर, क्वालिटी इन्स्पेक्टर ॲड सीएनसी ऑपरेटर, सेमी स्किल्ड वर्कमेन, फिल्ड ऑफीसर, सुपरवायझर, सिक्युरिटी गार्ड या पदांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी दु.02452220074 या क्रमांकावर संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-