Maharshtra News Nanded News

प्रवासी वाहतूकीबाबत तक्रार असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयास संपर्क करावा

 

प्रवासी वाहतूकीबाबत तक्रार असल्यास

प्रादेशिक परिवहन कार्यालयास संपर्क करावा

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्हयात संप काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी  खाजगी बस, स्कूल बस, मालवाहू वाहनमध्ये प्रवासी वाहतुक करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. याबाबत काही तक्रार असल्यास कार्यालयाचे दूरध्वनी क्र.02462-259900 / mh26@mahatranscom.in यावर ईमेल करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राउत यांनी केले आहे.

गृह विभाग (परिवहन) यांच्या 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे. जिल्हयातील प्रवासी वाहतुक सुरळीत होण्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बस, स्कुल बस संघटनाच्या प्रतिनीधीची बैठक 9 नोव्हेंबर 2021 रोजी परिवहन कार्यालयात आयोजीत करुन सर्व घटनाच्या प्रतिनिधीना खाजगी बस उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश दिले.  जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधुन राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत या कार्यालयाने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

संपकालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रादेशिक परिहवन कार्यालयात 24 तास नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला आहे. कार्यालयातील वायुवेग पथकाचे अधिकारी विविध तालुक्यातील डेपोला भेट देवून प्रवाशांना उदघोषकानी (Loud Spicker) माहिती सांगून खाजगी बसेस इतर वाहनांच्या केलेल्या सुविधाबाबत माहिती देत आहेत.

वायुवेगपथकामार्फत खाजगी बस वाहनांची तपासणी करुन जादा भाडे आकारणी इतर सुविधाबाबत प्रवाशाकडुन माहीती घेत आहेत. या कार्यालयातील वायुवेगपथकाव्दारे  हिंगोली गेट ,बाफना पाँईट , एस.टी.स्टॅड बाहेर तसेच जिल्हयातील विविध डेपो जवळ खाजगी प्रवासी वाहने उपलब्द करुन देण्यात आली आहेत.अशा प्रकारची एकूण 158 खाजगी बस,स्कुलबस, इतर खाजगी वाहने उपलब् करुन देण्यात आली आहेत परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%