ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
नांदेड (जिमाका) दि. 10 :- प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजनेंतर्गत पीएसए प्लांट ऑपरेटर या अभ्यासक्रमासाठी, प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. संकल्प प्रकल्पातंर्गत हे प्रशिक्षण मोफत, निशुल्क देण्यात येणार आहे. उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनातर्फे प्रमाणपत्र देखील देण्यात येईल. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी कार्यालयाच्या क्र.02462-251674 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी व युवा युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत केले आहे.
या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता याप्रमाणे आहे. – एनटीसी (आयटीआय)/एनएसी फिटर /वेल्डर/एमएमटीएम/आरएसी/इलेक्ट्रीशियन/मेकॅनिक इन्स्ट्रमेंट, एओसीपी, एमएमसीपी,आयएमसीपी ट्रेड इत्यादी उत्तीर्ण असावेत असेही प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000