Maharshtra News Parbhani News

कोविड प्रतिबंधात्मक प्रथम डोस शत प्रतिशत लसीकरण मोहीमेचे आदेश जारी

परभणी, दि. 8 (जिमाका) :- राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून नागरिकांचे लसकरण लवकरात लवकर पुर्ण करण्यावर राज्य सरकार भर देत आहे. जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक प्रथम डोस लसीकरण अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळुन येत आहे. त्याअनुषंगाने दि.8 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये गावांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक प्रथम डोस शत प्रतिशत लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश प्र.जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी जारी केले आहेत. गावांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक प्रथम डोस लसीकरण करावयाचे शिल्लक लाभार्थी हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संबंधित तालुकास्तरावरील वर्ग-1 व वर्ग-2 अधिकाऱ्यांना या मोहिमेकरीता पालक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरी या अधिकाऱ्यांनी दि.8 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मोहिमेच्या सर्व टप्प्यावर योग्य नियोजन आणि पुर्व तयारी करुन नेमुन दिलेल्या गावांमध्ये कोविड प्रतिबंधात्म्क प्रथम डोस लसीकरण 100 टक्के पुर्ण करण्याची वैयक्तिक जबाबदारी असेल. या कामासाठी घोषित केलेले पालक अधिकारी त्यांच्या नियंत्रणाखालील कर्मचारी तसेच या गावातील बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, पोलिस पाटील, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार इत्यादी सर्व शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांचा गट तयार करुन व्यापक स्वरुपात मोहीम आखावी. गावांमध्ये 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी पालक अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या प्रयत्न करुन गावातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, पं.स.सदस्य, जि.प.सदस्य, मा.आमदार लोकप्रतिनिधी, बचतगट, धर्मगुरु, गावातील तरुण युवक-युवती, एनजीओं इत्यादी सर्वांना सामिल करुन घ्यावे. कोविड प्रतिबंधात्मक प्रथम डोस लसीकरण अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी पालक अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व गटाची व सरपंच तसेच सदस्यांची बैठक घेवून मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी कामाचे नियोजन करावे. प्रामुख्याने घरोघरी लसीकरण आवश्यक असल्याने पालक अधिकारी व सर्व टिमने गावातील प्रत्येक घरी लसीकरणासाठी प्रयत्न करावेत. मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी लसीकरणाच्या वेळा सकाळी व संध्याकाळी लाभार्थींच्या सोईनुसार लसीकरण करण्यात यावे. वेळेप्रसंगी रात्री उशिरापर्यंत थांबून लसीरकण पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बीट अंमलदार, पोलिस पाटील यांची मदत घ्यावी. गावांतील स्वस्त धान्य दुकानदारंनी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करतांनी शिधापत्रिकेत नमुद कुटुंबातील सर्व सदस्यांचे लसीकरण झाले किंवा नाही याची खात्री करावी व लसीकरण शिल्लक असलेल्या सदस्यांचे लसीकरण करुन घ्यावे त्यासाठी पालक अधिकाऱ्यांनी स्वतंत्र लसीकरण कॅम्पचे आयोजन करावे. दि.8 ते 12 नोव्हेंबर 2021 या मोहीम कालावधीमध्ये नियुक्त पालक अधिकाऱ्यांना तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यरत कर्मचारी व संबंधित गावातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करता येणार नाही व मुख्यालयही सोडता येणार नाही. विषयांकीत कोविड प्रतिबंधात्मक प्रथम डोस लसीकरण 100 टक्के करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या गोपनिय अहवालात त्यांचे प्रगतीदर्शक कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अभिप्रायाची नोंद घेण्यात येईल. मोहिमेदरम्यान गावात वेळोवेळी आवश्यक तो लस पुरवठा व पुरेशा प्रमाणात लस टोचक उपलब्ध होईल याची सर्व जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी नियुक्त केलेले पालक अधिकारी यांच्या कामकाजाबाबत प्रगतीदर्शक आढावा वेळोवेळी घेण्यात यावा. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. -*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: