परभणी, दि. 2 (जिमाका) :- नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नियमित 2 रुपये किलो गहू प्रती सदस्य व 3 रुपये किलो तांदूळ प्रती सदस्य या दराप्रमाणे धान्य मिळणार आहे. तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गहु व तांदूळ प्रतीसदस्य मोफत धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी दिली आहे. अत्योंदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2021 या महिन्यात प्रती कुटुंब 23 किलो गहु प्रती किलो 2 आणि 12 किलो तांदुळ प्रती किलो 3 रुपये दराने परभणी जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना अधिकृत शिधावाटप दुकानातून ई-पॉस मशिनवार स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी प्रती सदस्याप्रमाणे धान्य मिळावे यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार सिडिंगकरुन घ्यावे. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-