परभणी, दि. 2 (जिमाका) :- कल्याणकारी संस्था व वसतीगृहे योजनेअंतर्गत प्रती महिना प्रती विद्यार्थी, लाभार्थी 8 किलो गहु व 7 किलो तांदुळ या परिमानानूसार जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 127 कल्याणकारी संस्था व वसतीगृहांना गहु 2 हजार 582 व तांदुळ 2 हजार 259 क्विंटल नियतनाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाचे केंद्र व राज्य शासन अनुदानित संस्था, वसतीगृहे चालु असल्यास मागणी संबंधीत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी (अपंग विभाग), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी किंवा तहसिलदार यांच्याकडे तात्काळ धान्य मागणी करावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी केले आहे. -*-*-*-*-