परभणी, दि. 2 (जिमाका) :- मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पात्र परंतू अद्यापही मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या समाजातील वंचित घटक जसे देह व्यापार करणाऱ्या महिला, तृतीयपंथी व दिव्यांगाना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम दि.13 व 14 नोव्हेंबर 2021 आणि दि.27 व 28 नोव्हेंबर या कालावधीत सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण दि.1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. तरी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र.6, मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी नमुना क्र.7, मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना क्र.8 आणि एकाच मतदारसंघात मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना क्र.8-अ हा अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. तरी विशेष मोहिमेत नमुना अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत व परभणी शहराच्या हद्दीमध्ये रहिवास करत असल्यास परभणी शहर महानगरपालिकेकडे सादर करावेत. किंवा आयोगाने विकसित केलेल्या व्होटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन पध्दतीने करावेत. -*-*-*-*-