Maharshtra News Nanded News

आयकर…

आयकर मर्यादेपेक्षा जास्त निवृत्ती वेतन असणाऱ्या

निवृत्ती वेतनधारकांनी माहिती सादर करावी 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- येथील कोषागारामार्फत सेवानिवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी  ज्यांचे सन 2021-22 एकत्रित निवृत्ती वेतन 5 लाख 50 हजार व त्यापेक्षा जास्त आहे त्यांनी आपला आयकर सुट मिळण्यासाठी पात्र बचतीचा तपशील बुधवार 10 डिसेंबर 2021 पर्यंत अर्जासोबत पुराव्यासह कोषागारात सादर करावा, अन्यथा नियमाप्रामणे आयकर कपात करण्यात येईल. 

आयकर वसुलीचे नवीन नियम सेक्शन 115 बीएसी नुसार  नवीन कर व्यवस्था (New Tax Regime  ) व जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime) असे दोन पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. यापैकी आपणास जो पर्याय आयकर कपातीसाठी निवडावयाचा आहे. त्याची माहिती 10 डिसेंबर 2021 पूर्वी कळविण्यात यावी अन्यथा जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime)  हा विकल्प आपण स्विकारल्याचे गृहीत धरुन नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल. कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी आयकरासाठी कोणतीही बचतीची माहिती सादर करु नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%