Maharshtra News Nanded News

 अवैद्य…

 अवैद्य सावकारी व्यवसाय केल्याबद्दल योगेश चौधरी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :-  धर्माबाद येथे अवैध सावकारी व्यवसाय केल्याबदल योगेश पांडुरंग चौधरी यांच्या विरूध्द धर्माबाद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे लक्षात येताच सहायक निबंधक कार्यालयाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16  अन्वये पथक नियुक्त करून त्यांच्या घराची झडती घेतली.

4 ऑक्टोबर 2021 रोजी घेतलेल्या झडतीमध्ये 2008 ते 2021 या कालावधीतील शेकडा 3 ते 5 टक्के व्याज  दराने रक्कमा दिल्याच्या नोंदी असलेल्या वह्या हिशोबाच्या चिट्टया आणि प्रामोसरी नोट इत्यादी कागदपत्रे आढळुन आले. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 अन्वये वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारीचा व्यवसाय करत असेल त्या व्यक्तीला कारावासाची किंवा द्रव्यदंडाची दोन्ही शिक्षा करण्यात येतील अशी तरतूद आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय सहकारी संस्थेचे सहनिबंधक सचिन रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 जून 2021 च्या प्राप्त अर्जानुसार करण्यात आली आहे.

000000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: