Maharshtra News Nanded News

 आरोग्‍य…

 आरोग्‍य विभागातील गट ड पदभरती परीक्षा केंद्र

परिसरात कलम 144 लागू    

नांदेड, (जिमाका) दि. 27 :- आरोग्‍य विभागातील गट ड पदभरती परीक्षा रविवार 31 ऑक्‍टेांबर रोजी दुपारी 2 ते सायं. 4 वाजेपर्यंत एका सत्रात 58 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केला आहे. 

या परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात रविवार 31 ऑक्‍टेांबर रोजी दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंतच्‍याकालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारीकर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंतच्‍या या कालावधीत दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी,फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे.

00000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: