Maharshtra News Parbhani News

कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

** परभणी, दि.24 :- राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 3:30 वाजता रेल्वे स्थानक परभणी येथे आगमन, सकाळी 3:50 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे आगमन व राखीव, सकाळी 8:30 वाजता परभणी जिल्हा कृषि आढावा बैठक ( स्थळ- व.ना.म. कृषि विद्यापीठ सभागृह), सकाळी 11 वाजता 23 व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती, दुपारी 1:30 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने हसनापुर ता. परभणीकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता हसनापुर येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी, दुपारी 2:20 वाजता पेडगाव येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी, दुपारी 2:35 वाजता पेडगाव येथून मंठा जि.जालनाकडे प्रयाण करतील. -*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%