Maharshtra News Parbhani News

बालकामगार कामावर ठेवणार नाही; आस्थापना मालकांनी दिले हमीपत्र

परभणी, दि. 21 (जिमाका) : बालकामगार विरोधी जनजागृतीचा भाग म्हणून परभणी शहर व तालुक्याच्या ठिकाणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीच्या संयुक्त विद्यमाने दि.27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी आस्थापना मालकांकडून बालकामगार कधीही कामावर ठेवणार नाही असे हमीपत्र भरुन घेण्यात आले. यामध्ये परभणी शहरात 1 हजार 88 तर सर्व तालुक्याच्या ठिकाणी 1 हजार 57 असे एकुण 2 हजार 145 आस्थापना मालकांकडून हमीपत्र भरुन घेण्यात आले. ही मोहीम जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीच्या अध्यक्षा आंचल गोयल व सरकारी कामगार अधिकारी अ.अ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. असे परभणीचे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. -*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: