Maharshtra News Nanded News

 पोलीस…

 पोलीस स्मृती दिनानिमित्त मान्यवरांचे अभिवादन 

नांदेड, (जिमाका) 21 :- कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे व इतर राष्ट्रीय कर्तव्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी पार पाडतात. आपले कर्तव्य बजावत असतांना पोलीस खात्यातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून विरगतीही प्राप्त केली आहे. यावर्षी संपूर्ण भारतातून सुमारे 377 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावतांना विरगती प्राप्त केली आहे. त्यांच्या सन्मानार्थ पोलीस मुख्यालयाच्या नांदेड येथील कवायत मैदान येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात आले.
 
पोलीस विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज शहीद पोलीसांना अभिवादन केले. यावर्षी शहीद झालेल्या जवानांच्या नावाचा गौरावाने उल्लेख करण्यात येऊन शस्त्र सलामी देण्यात आली.
0000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: