नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- शंकर नगर तालुका बिलोली येथील भारत सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्ष इयत्ता सहावी व नववी वर्गात प्रवेशासाठी  निवड चाचणी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे.इच्छुकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक असून  प्रवेशाकरिता www.navodayz.gov.in किंवा http://www.nvsadmissionclassnine या वेबसाईटवर अर्ज करता येईल.

पुढील शैक्षणिक वर्ष 2022 साठी 30 नोव्हेंबर 2021 तर नववी करिता 31 ऑक्टोबर 2021 पर्यत ऑनलाईन फार्म भरता येतील.  नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी अर्ज करावा. इयत्ता सहावीच्या प्रवेश परिक्षा  30 एप्रिल 2022 रोजी  तर  नववी वर्गात प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा 9 एप्रिल 2022 रोजी होईल. इयत्ता सहावीसाठी 80 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.नववी साठी रिक्त जागा झाली तर प्रवेश उपलब्ध होईल असे  आवाहन प्रभारी प्राचार्य अवधेश कुमार  पांण्डेय यांनी केले आहे.

000