Maharshtra News Parbhani News

मिशन कवचकुंडल लसीकरण अभियान; सर्व नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी, दि. 08 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या असून या उपाययोजना यशस्वी होताना दिसून येत आहेत. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी दि. 8 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मिशन कवचकुंडल लसीकरण अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विशेष लसीकरण मोहिमेत नागरी भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मानवत नगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यतील एकुण 8 नगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड लसीचा अठरा वर्षावरील लाभार्थी 2 लाख 23 हजार 31 असून त्यापैकी 1 लाख 5 हजार व्यक्तींनी पहिला डोस घेतलेला आहे म्हणजेच या वयोगटातील 47 टक्के व्यक्तींचा पहिला डोसचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येक नगरपालिकेतील प्रत्येक प्रभागनिहाय लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातील 8 नगरपालिका क्षेत्रात 80 प्रभागासाठी प्रत्येक एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असून त्यासाठी 80 परिचारिका व 250 सहाय्यक कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. आठ नागरी भागातील प्रत्येक केंद्राचा दररोजचा लक्षांक 300 असून पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर लोकांना मदत करण्यासाठी तसेच लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी नगरपालिका कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. यात लसीकरणासाठी लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. तरी या लसीकरण मोहिमेत नागरी भागातील नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. -*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%