Maharshtra News Parbhani News

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सामाजिक दायीत्वानूसार खाजगी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात सेवा द्यावी

परभणी, दि.05 (जिमाका) :- कोविड-19ची परिस्थिती पाहता मागील वर्षी मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्प्रमाणात करण्यात आलेल्या असल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रतिक्षा यादी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पात्रता यादी आहे. तरी जिल्ह्यातील खाजगी नेत्ररोग शल्य चिकित्सक तज्ञांनी सामाजिक दायीत्वानूसार जिल्हा रुग्णालयात येवून नेत्ररोग शस्त्रक्रिया करण्यास पुढाकार घ्यावा तसेच खाजगी नेत्ररुग्णालयामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी जनजागृती करुन शस्त्रक्रिया कराव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस तसेच महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माय बापासाठी थोडेसे या कार्यक्रमाचे औचित्यसाधून परभणी जिल्ह्यातील ज्या वयोवृध्दांना मोतीबिंदू झाले आहेत अशा लोकांच्या मोठ्या प्रमाणात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा जिल्हा रुग्णालय व जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय व सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रिया सुरु करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणी करण्यात येत असते. तरी अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील मोतीबिंदु शस्त्रक्रिया पात्र ज्येष्ठ नागरिकांनी शस्त्रक्रिया करुन घ्यावी. असेही जिल्हा शल्यचिकित्सक, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: