Maharshtra News Parbhani News

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित पिकांची पाहणी

परभणी, दि.03 (जिमाका):- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीग्रस्त पिकांची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिला. पूर परिस्थितीमुळे व अतिवृष्टीने बाधित झालेल्या गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुनेगाव शिवारातील कारभारी माणिक सूर्यवंशी व जनार्दन साहेबराव सूर्यवंशी यांच्या शेतातील सोयाबीन पिकांची पाहणी केली. तर पालम तालुक्यातील पालम शिवारातील सखाराम तुकाराम रायबोले यांच्या कापूस पिकाची तसेच अबूबकरबिन फराज चाऊस यांच्या सोयाबीन पिकाची यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी करुन शासन सर्वोतोपरी शेतकरी बांधवाना मदत करेल सांगितले. यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, माजी आमदार मोहन फड, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: