Maharshtra News Parbhani News

गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे

परभणी, दि.29 (जिमाका) :- सद्यस्थितीत जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश धरणे हे पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे व गोदावरी नदीवरील सर्व उच्चपातळी व मध्यम बंधारे हे पुर्ण क्षमतेने भरलेले असून त्यामधून अतिरीक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तरी जिल्हयातील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे. जायकवाडी धरणाच्या निम्न बाजुचे गोदावरी नदीवरील सर्वच उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये 100 टक्केच्या जवळपास जलसाठा भरल्याबाबत कळविण्यात आहे . तसेच सध्या जायकवाडी धरणातून दि . 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता 9432 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याबाबत संदेश प्राप्त झाला आहे. तरी नदी पात्रात कोणीही उतरु नये , वाहने , पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवावे तसेच नागरिकांनी सुरक्षित व सतर्क राहण्याची खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%