Maharshtra News Parbhani News

मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती आणि इतर माहितीसाठी 5 ऑक्टोबरला फेसबुक लाईव्ह

परभणी, दि.1 (जिमाका) :- जिल्ह्यातील मतदार व नागरिकांना मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्याबाबतच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवार दि.5 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा माहिती कार्यालयाच्या Dio Parbhani या अधिकृत फेसबुक पेजवरुन फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थिती लावावी. जेणेकरुन नागरिकांना मतदार यादी विषयक असलेल्या शंकाचे समाधान होण्यास मदत होईल. फेसबुक लाईव्हमध्ये परभणीचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: