परभणी, दि.1 (जिमाका) :- श्रीमती ज्योती बळीराम आचणे वय 24 ही महिला परभणी येथील दर्गा रोडवरील रामनगर येथून दि.28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपासून गायब झाली आहे. तीने जातेवेळी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यात तिने ती पुणे येथे जात असल्याचे नोंद केली आहे. महिलेची उंची पाच फुट, रंग गोरा व अंगावर हिरव्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाची लेगीन ड्रेस असून काळ्या रंगाचा बुरखा व पांढऱ्या रंगाचा स्टॉल, पायात रंगाची चप्पल असे वर्णन असून या मुलीकडे कोणत्याही प्रकारचा मोबाईल नाही. तरी ही महिला कुठे दिसून आल्यास परभणी येथील कोतवाली पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-