परभणी, दि.1 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र अधिनियम 2020 मधील कलम क्र.23 मध्ये नियामक परिषदेबाबत तरतूद असून या नियमातील पोटकलम (4) च्या अनुषंगाने शासनाने 9 सदस्यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रच्या नियामक परिषदेसाठी सदस्य म्हणुन नियुक्ती केली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यामध्ये माजी फुटबॉल खेळाडू हेन्नी मेनेझिस, माजी रग्बी खेळाडू राहुल बोस मुंबई, सिएसोच्या मुख्य संचालिका डॉ.विद्या येरवडेकर, बीसीसीआय व आयसीसी संघटनेचे सदस्य प्रा.रत्नाकर शेट्टी, मैदानी खेळाडू डॉ.अंजली ठाकरे,विविध संघटनांचे सदस्य निलेश कुलकर्णी, शुटींग खेळाडू अंजली भागवत, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांना शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे. -*-*-*-*-