National News

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करू न एकरी 50 हजार रूपये मदत द्या..।

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजार रूपये मदत द्या..।

भोकर विधानसभा युवक काँग्रेसची मागणी….।

अर्धापूर /शेख जुबेर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात दि. 6 व 7 आणि 27,28 ला सर्वाधिक 130 मिलीमीटर पाऊस होवून अतिवृष्टी झाली.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, सर्वच पिके पाण्याखाली जावून जमिनी खरडून गेल्या.अर्धापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50 हजार रुपये तात्काळ मदत द्यावी अशी मागणी भोकर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतिने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसीलदार, अर्धापूर मार्फत देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुर,मुग,उडीद,हळद, केळी,ऊस या काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नदीकाठच्या गांवामध्ये व शेतामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पंचनामा न करता सरसकट मदत करावी अशी मागणी भोकर विधानसभा युवक काँग्रेसच्या करण्यात आली.

यावेळी भोकर विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव मिर्झा अबुजरउल्ला बेग,उपनगराध्यक्ष डाँ.विशाल लंगडे, नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव उमाकांत सरोदे,स्वप्नील पाटील टेकाळे,विलास देशमुख,अर्जुन गाढे,साईनाथ जाधव,मोहम्मद आयाज,शेख मकसुद आदींची उपस्थिती होती.

%%footer%%