Maharshtra News Parbhani News

माजी सैनिकांच्या पत्नी व पाल्यास विशेष पुरस्कारासाठी आवाहन

परभणी दि.23,(जिमाका) : माजी सैनिकांचे पाल्य अथवा पत्नींनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी माजी सैनिक अथवा त्यांचे पाल्य किंवा पत्नीने अर्ज कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि.15 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, पुर, जळीत, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारे तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी अशा माजी सैनिकांच्या पाल्य, पत्नीना सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरावरील 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा पुरस्कार शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतुद आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02452 220340 या क्रमांकावर संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: