Maharshtra News Parbhani News

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

परभणी दि.23,(जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.23 सप्टेंबर 2021 रोजी नांदेड येथून सायंकाळी 6.50 वाजता परभणी येथे आगमन. सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी शहर जिल्हा कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. राखीव व मुक्काम करतील. शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता ते 11.45 वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट, सकाळी 11.45 ते 12.30 वाजता रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता परभणी येथून जिंतूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जिंतूर येथे आगमन व दुपारी 2 ते 2.30 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 3.15 वाजता जिंतूर येथून पाथरीकडे प्रयाण करतील. दुपारी 4.30 वाजता पाथरी येथे आगमन. दुपारी 4.30 ते 5.15 वाजेदरम्यान रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत पाथरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता पाथरी येथून परतूरकडे प्रयाण करतील. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: