Maharshtra News Parbhani News

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा; केंद्र परिसरात 144 कलम लागू

परभणी दि.21,(जिमाका) : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी व बारावी) दि.16 सप्टेंबर ते दि.11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील परीक्षा एकुण 17 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत असून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी परभणी येथील बालविद्या मंदीर हायस्कुल, पुर्णा येथील संस्कृती माध्यमिक विद्यालय, गंगाखेड येथील व्यंकटेश माध्यमिक विद्यालय, पालम येथील जिल्हा परिषद हायस्कुल, सोनपेठ येथील जिल्हा परिषद हायस्कुल, जिंतूर येथील ज्ञानेश्वर विद्यालय, पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालय, मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालय, सेलू येथील नुतन बहुविध विद्यालय तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी परभणी येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालय, पुर्णा येथील गुरुबुध्दी स्वामी कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, गंगाखेड येथील संत जनाबाई संस्थेचे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, पालम येथील ममता कनिष्ठ महाविद्यालय, सोनपेठ येथील महालिंगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, जिंतूर येथील ज्ञानोपासक कला व वाणिज्य महाविद्यालय, पाथरी येथील नेताजी सुभाष कनिष्ठ महाविद्यालय आणि मानवत येथील के.के.एम. कनिष्ठ महाविद्यालय येथे परिक्षेची केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व दुरध्वनी, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. हे आदेश परीक्षार्थी, परीक्षेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी,प्राध्यापक, शिक्षक तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही. गुरुवार दि.16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दि.11 ऑक्टोबर 2021 सायंकाळी 7 वाजेपर्यंत आदेश लागू राहतील तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्द करावे असेही आदेशात नमुद केले आहे. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: