Maharshtra News Parbhani News

पीक पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसीय विशेष मोहीम -जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी दि.21,(जिमाका) : राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी, पुर, कोरोना महामारी व उशीराच्या मान्सूनमुळे आणि ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचा थोडा उशीरा शुभारंभ याचा विचार करुन खरीप हंगामाची पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी गुरुवार दि.30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात 20 सप्टेंबर 2021 अखेर 76 हजार 957 शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करुन पेकपेरा नोंदणी पुर्ण केली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुध्दा त्यांचा पीकपेरा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे विहीत मुदतीत नोंदविण्यासाठी दि.22 ते 24 सप्टेंबर 2021 कालावधीत तीन दिवसीय विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील उर्वरित 2 लाख 70 हजार 961 शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदणी पुर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे. जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांवर विशेष मोहिमेत उर्वरित एकुण 2 लाख 70 हजार 961 शेतकऱ्यांची नोंदणी पुर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यात दि.22 ते 24 सप्टेंबर 2021 या कालावधीत तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करुन ही मोहीम यशस्वी करावी अशा सुचनाही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती करावयाची असून त्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगारसेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशिल शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचाल, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकांची निवड करुन त्यांच्या सहाय्याने गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करावयाचे आहे व पीकपेरा भरुन घेण्याची कार्यवाही करावयाची आहे. तसेच मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मंडळनिहाय, सज्जानिहाय नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांना पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून जबाबदारी निश्चित करुन दररोज होणाऱ्या कामाचा आढावा घेण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोहिमेच्या कालावधीत आपल्या अधिनस्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत व जिल्ह्यातील उर्वरित एकुण 2 लाख 70 हजार 961 शेतकऱ्यांचे पीकपेरा नोंदणी पुर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे निर्देशही देण्यात आले आहेत. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: