Maharshtra News Parbhani News

आदिवासी शेतकऱ्यांनी शेळीगट पुरवठा योजनेसाठी अर्ज करावेत

image.png परभणी दि.22,(जिमाका) : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या वन हक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीस पुरक व्यवसाय म्हणून शेळीगट पुरवठा करावयाचा आहे. तरी शेळीगट पुरवठा योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज गुरुवार दि.14 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन कळमनूरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी केले आहे. वैयक्तिक लाभाच्या शेळीगट पुरवठा योजनेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्जदार वन हक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणारा आदिवासी शेतकरी असावा. वनपट्टे प्राप्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र व सातबारा उतारा असणे आवश्यक राहील. अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र, 2021 या वर्षातील उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्डाची छायांकित प्रत, आधार जोडणी केलेले अर्जदाराचे बँक पासबुक व अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तरी लाभासाठी परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज दि.14 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेले व परिपुर्ण नसलेले अर्ज स्विकारले जाणार नाही. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: