Maharshtra News Parbhani News

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम रब्बी हंगाम 2021-22 अंतर्गत परभणी दि.21,(जिमाका) : शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने हरभरा व गहु या पिकासाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील तालुकानिहाय पुढील 3 वर्षाकरीता प्रतीवर्ष एक तृतीयांश गावाची निवड करण्यात येणार आहे. तालुकानिहाय लक्षांक जिल्हास्तरावरुन निर्धारीत करण्यात आला आहे. त्यानुसार मार्गदर्शक सुचनांमध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन निवड केलेल्या गावातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पार्टलवर अर्ज सादर करावेत. असे आवाहन परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत (NMAT)बियाणे व लागवड साहीत्य उपअभियान कार्यक्रमाअंतर्गत रब्बी हंगाम 2021-22 मध्ये फार्म सेव्हड सिडस वृध्दींगत करुन शेतकरीस्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियान अंतर्गत हरभरा व गहु या पिकासाठी ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम कृषी विभाग व महाबिज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यास हरभरा पिकासाठी 4 हजार 175 क्विंटल व गहु पिकासाठी 1 हजार 145 क्विंटलचे लक्षांक प्राप्त आहे. ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रती शेतकरी 1 एकराच्या मर्यादेत लाभ मिळणार असुन हरभरा पिकासाठी 10 वर्षाआतील (फुले विक्रम,राजविजय-202, AKG-1109, फुले विक्रांत) ‍बियाणांसाठी 25 रुपये प्रतीकिलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील (जॅकी 9218,दिग्विजय,विजय,विशाल,विराट)बियाणांसाठी 12 रुपये प्रतीकिलो अनुदान देय आहे. तसेच गहु पिकासाठी 10 वर्षाच्या आतील (फुले समाधान, NPAW-1415)‍ बियाणेसाठी 20 रुपये प्रतीकिलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील MACs-6222,HI1544, GW-496, लोकवन)‍ ‍बियाणांसाठी 10 रुपये प्रतीकिलो अनुदान देय आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी नजीकच्या सामुहीक सेवा केंद्रे याठिकाणी जाऊन किंवा ज्या शेतक-यांकडे ॲन्ड्रॉईड स्मार्ट मोबाईल आहेत त्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन “महाडीबीटी फार्मर” हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे. ही सुविधा वापरा करता आयडी व आधार क्रमांक आधारीत असल्याने एकाच गावातुन स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हे ॲप्लीकेशन डाऊनलोड केल्यास अनेक शेतकरी अर्ज करु शकतील. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख दि.25 सप्टेंबर 2021 आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: