Maharshtra News Parbhani News

कोरोनाची लस न घेणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाही – जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी दि.20,(जिमाका) : जिल्ह्यात जून महिन्यापासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोनाची लस देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सर्वत्र लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यात आली असुन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतू परभणी जिल्ह्यात अजूनही लसीकरणाला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पुढील काळात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत एकही लस घेतलेली नाही त्यांना यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कळविले आहे. त्यामुळे आता नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करतांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत आहे, तसे नागरिकही निर्धास्त होत असुन लसीबाबतचे समज गैरसमजातून अनेकजण लस घेण्याचे टाळत आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरी लाट ओसरत असतानाच भारतातच नाही तर जगभरात कोरोना व्हायरस वेगाने बदलू लागला. या जनुकीय बदलांमुळे नव्याने तयार झालेला आणि अधिक संसर्गजन्य असलेले डेल्टा व्हेरियंट्स अधिक त्रासदायक ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लसीकरण करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविली जात असुन जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लस घेतली नाही त्यांनी तात्काळ आपले आणि आपल्या कुंटूबियाचे लसीकरण करुन घ्यावे. तसेच आपले आणि इतरांचे संरक्षण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: