Maharshtra News Parbhani News

शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री नवाब मलिक

 

परभणीदि.17,(जिमाका) : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे असे निर्देश अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेती नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात राज्याचे  अल्पसंख्याक विकास व औकाफकौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज  पुर्णापालमगंगाखेड आणि सोनपेठ तालूक्यात अतिवृष्टीमुळे शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केलीयावेळी पाहणी दौऱ्यात आमदार रत्नाकर गुट्टेजिल्हाधिकारी आंचल गोयलजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळेजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहेबाधित झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करुन लवकरच मदत मिळवून देण्यात येईलअतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने राज्य शासन निर्णय घेऊन मदत करणार आहेतसेच प्रशासनानेही तातडीने पंचनामे पूर्ण करुन लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची‍ कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकरी शोभा रुस्तुम मोरे  यांच्या शेतातील अतिवृष्टीने झालेल्या सोयाबिन पिकाच्या नुकसानीची पाहणी केलीतर माटेगाव येथील शेतकरी सोपान मारोतीराव बोबडे यांच्या शेतातील अतिवृष्टीने झालेल्या सोयाबिन पिकाच्या नुकसानीची पाहणी केलीपालम तालूक्यातील जवळा येथील रावसाहेब नागोराव खटींग यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केलीतसेच गंगाखेड तालूक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी लक्ष्मण किशनराव दणदणे यांच्या शेतातील अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन आणि कापूस पिकांची तर मरडसगाव येथील शेतकरी त्रिंबक काळे यांच्या शेतातील पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केलीतर सोनपेठ तालूक्यातील भिसेगाव येथील शेतकरी अकुंश मारोतराव कदम यांच्या शेतातील कापूस पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांना धीर देत शासनाकडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले

****

 

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%