Maharshtra News Parbhani News

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते चार ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना वितरण

 

 

            परभणी, दि.16 (जिमाका) :अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या  10 लाखापर्यंतच्या बिन व्याजी कर्ज योजनेतून आज परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अंगद चव्हाण, बाबाराव जाधव, मदन निर्वळ, गजानन सोळंके या 4 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

            यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल,आदि उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिले जाते. त्यासाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची परतफेड करतांना व्याजाची रक्कम पाच वर्षासाठी  12 टक्के मर्यादेत अथवा 3 लाख रुपयांच्या मर्यादेत ही महामंडळातर्फे लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बचत खात्यात परतावा केली जाते.  याच योजनेअंतर्गत गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येवून सुरु केलेल्या उद्योग  व्यवसायासाठी सुध्दा पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाख रुपयांच्या मर्यादेत व्याजाची रक्कम दरमहा महामंडळामार्फत गटाच्या बँक खात्यात जमा केली जाते. अशी ही योजना आहे.

-*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%